Solar pump payment ; तुम्हाला सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे मेसेज आले का
Solar pump payment ; शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून 90% , 95% अनुदानावर सोलार पंप दिले जातात. यामध्ये पिएम कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप तसेच महावितरण च्या माध्यमातून सोलार पंप योजना राबविल्या जातात. राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहे. (Solar pump yojna 2024)
सोलार पंपासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंट हि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. महावितरणकडून पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे मेसेज दिले आहे आणि 24/ऑक्टोंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी दिला होता ज्या लाभार्थानी सेल्फ सर्वे आणि पेमेंट केले होते त्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आणि त्यांनी सेल्फ सर्वे आणि पेमेंट केले नाही अशा लाभार्थ्यांना बाद करून नवीन लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंट चे ऑप्शन देण्यात आले आहे. (Solar pump updates 2024)
कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत मागेल त्याला अर्ज मंजूर नवीन लाभार्थ्यांना मेसेज येणे सुरू झाले आहे. पात्र लाभार्थाना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक मेसेज येतो तसेच तुमचा अर्ज मंजूर आहे का हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा तपासून पाहु शकता. मेसेज आला असेल तर सेल्फ सर्वे आणि पेमेंट करून सोलार पंपाचा लाभ घ्यावा. तसेच तुम्हाला आलेला मेसेज खरा आहे का याबाबत तपासणी करून नंतर पेमेंट करावे.