Ration e-kyc ; या लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद (रेशन कार्ड न्युज)
Ration e-kyc ; केंद्र सरकारने राशन कार्ड चे बोगस लाभार्थी हटवण्यासाठी राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. या आधी केंद्र सरकारने 30 जुन हि राशन आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती आता यामध्ये वाढ करुन 31/ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत. (Ration aadhaar link)
केंद्र सरकार वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत आधार आणि राशन लिंक करणं बंधनकारक करत आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावावरील राशन बंद होईल तसेच गरजू लोकांना राशन धान्य पोचवणे शक्य होईल. तसेच मयत व्यक्तीचे नाव राशन कार्ड मधुन काढण्यासाठी शिधावाटप कार्यालयात संपर्क करावा. (Ration card news)
अनेक लाभार्थींकडे एकापेक्षा जास्त राशन कार्ड आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते राशनचा लाभ घेत आहेत. तसेच घरातील मृत सदस्याच्या नावाने राशन घेतले जात आहे. या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्यांना आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी सक्ती केली आहे. जे राशन कार्ड धारक आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाही त्या लाभार्थ्यांचे राशन 31/ऑक्टोंबर पासून बंद होणार आहे.
राशन कार्ड ईकेवायसी कुठे आणि कशी करावी…
राशनकार्ड ईकेवायसी करण्यासाठी आपल्या राशन दुकानदाराकडे जाऊन करु शकता. तसेच हि प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा केली जाते. तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक केले नसेल तर 31/ऑक्टोंबर आधी ही प्रक्रिया पुर्ण करा म्हणजे तुमचे राशन बंद होणार नाही.
अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.