Pikvima news ; अखेर या जिल्ह्यासाठी 25% पीक विमा मंजूर….
Pikvima news ; शेतकरी मित्रानो नांदेड, हिंगोली, नागपूर, जळगावच्या पाठोपाठ जालना जिल्ह्यामंध्ये देखील 25% पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यामंध्ये देखील ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतक्याच्या शेतीपिकांचे मिठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान झाल्या असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या त्याच पार्श्वभुमीवरती जालना जिल्ह्यामंध्ये रँडम सर्वेक्षण करण्यात आले होता.
रँडम सर्वेक्षनाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकरर्यांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जालना जिल्हा, जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून, जालना जिल्ह्यामंध्ये 25% पीक विमा मंजूर करण्या संदर्भातील, एक अधिसूचना निर्गमित करून जिल्हाधिकारी, डॉ. श्रीकृष्णा पंचाळ यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामंध्ये 25% पीक विमा मंजूर करून एक महिन्याच्या आत पीक विमा वाटप करण्यासाठी सांगितले आहे.
ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये जालना जिल्ह्यामंध्ये तूर, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांचा पीक विमा 25% अग्रीम म्हणून मंजूर करण्यात आला आहे. याचे वितरण दिवाळीच्या अगोदर करण्यात येऊ शकते.