Pikvima news ; या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्याला पीक विमा मिळणार……
Pikvima news ; शेतकरी मित्रानो गेल्या वर्षी झालेल्या दुष्काळीमुळे पिक विमा वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली होती. आणि हे सहा जिल्हे पिक विमा वाटप करण्यास राहिले होते. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप-2023 साठी 1927 कोटी रुपयांचा प्रलंबित पिक विमा वाटप होणार आहे.
खरीप 2023 साठी 1927 कोटी रुपयांचा प्रलंबित पिक विमा या जिल्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामंध्ये सातारा, चंद्रपूर, नगर, सोलापूर, जळगाव आणि नाशिक या जिल्यातील शेतकऱ्यांना खरीप-2023 चा प्रलंबित असलेला पीक विमा मिळणार आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ओरिएंटल कंपनीमार्फत पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. (Pikvima news)
या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीच हा पिक विमा मिळाला असता पण हा पिक विमा इतक्या दिवस प्रलंबित का राहिला? त्यामागचे कारण म्हणजे राज्यात राबवण्यात येणारे “बीड पॅटर्न”. बीड पॅटर्नच्या मार्फत 110% च्या जर जास्तीचा पीक विमा मंजूर झालेला असेल, तर तो पीक विमा राज्य सरकारच्या मार्फत द्यावा लागत असतो. आणि 110% पर्यंत जर पीक विमा मंजूर झालेला असेल तर तो पीक विमा, पीक विमा कंपन्याच्या मार्फत देण्यात येतो.
गेल्या वर्षी ओरिएंटल कंपनीकडे जे जिल्हे होते त्या जिल्ह्यांची नुकसान भरपाई 110% पेक्षा जास्त गेली होती. ओरिएंटल कंपनीचे जे नुकसान भरपाई आहे ही 200 टक्क्यांपेक्षा देखील अधिक गेली होती. त्यासाठी ओरिएंटल कंपनीने 110% च्या वरची रक्कम राज्य सरकारकडे मागणी केली होती. 110%च्या वरची रक्कम जर राज्य सरकारने दिली तर आम्ही हा पिक विमा वाटप करू, असे ओरिएंटल कंपनीने सांगितले होते.
ओरिएंटल कंपनीकडे पिक विमा वाटप करण्याची रक्कम 1255 कोटी रुपयांची आली होती. परंतु या कंपनीला विमा भरण्याची रक्कम 3307 कोटी रुपयांची आली होती. परंतु बीड पॅटर्नच्या माध्यमातून या कंपनीला 110टक्क्यांच्या प्रमाणे 1380 कोटी रुपयांची रक्कम भरपाईला मिळाली. आणि 110% च्या वरची रक्कम राज्य सरकारने द्यावी, त्याकरिता राज्य सरकारकडे भरपाईची रक्कम 1927 कोटी रुपयांची मिळाली होती.
ओरिएंटल कंपनीने 110% च्या पुढची रुक्कम राज्य सरकारकडे मागणी केली होती, आता ती रक्कम राज्य सरकारच्या मार्फत विमा कंपन्याला देण्यात आली आहे. त्यामुळे या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्याला विमा देण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामातील राज्यातील शेतकऱ्यांना दुष्कारी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्याकरिता खरीप हंगाम 2023 मंध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला होता. 2023 मंध्ये शेतकऱ्यांना ऐकून 7621 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता. त्यातून पीक विमा कंपन्याने आतापर्यंत 5469 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप केला आहे. आणि आता राज्य सरकारने 1927 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच वितरित करण्यात येईल.
कोणत्या जिल्याला किती पीक विमा मंजूर झाला….Pikvima news
सरकारच्या मार्फत 6 जिल्ह्यांसाठी 1927 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केला. यामंध्ये सातारा जिल्यासाठी 27.73 कोटी, जळगाव जिल्यासाठी 480 कोटी, नगर जिल्यासाठी 713 कोटी, सोलापूर जिल्यासाठी 2.66 कोटी, चंद्रपूर जिल्यासाठी 58.90 कोटी आणि नाशिक जिल्हासाठी 656 किटी रुपये या जिल्हासाठी मंजूर करण्यात आले आहे.
हा पीक विमा या 6 जिल्हासाठी लवकरात-लवकर मिळणार आहे. असे, विनयकुमार आपटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तलय पुणे यांनी सांगिलते आहे.