Nuksab bharpai 2024 ; अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर
शेतकरी मित्रानो, ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे राज्यातील 7 जिल्ह्यामधील 975059 शेतकऱ्यांना 997 कोटी 4 लाख 36 हजाराचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून, नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार असल्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी आज 4 ऑक्टोम्बर 2024 रोजी राज्य सरकारच्या मार्फत GR निर्गमित करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील आपण पहिले तर, मे, जून, जुलै या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत वेळोवेळी gr काढून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली असल्यामुळे, बरेच शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झालेले होते. त्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव साधार करण्यात आले होते. या प्रस्तावाच्या मार्फत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात सुरवात झाली आहे. Nuksab bharpai 2024
Nuksab bharpai 2024
याच्यामंध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा याच सोबत उत्तर महाराष्ट्र आणि पुणे विभागामंध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून यामधील काही जिल्ह्याला समाविष्ट करून 997 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.
यामंध्ये विभागीय आयुक्त कोकण यांच्या मार्फत दि. 27/9/2024 या दिवसी पाठविण्यात आलेल्या प्रसावानुसार रायगड जिल्ह्यातील 147 शेतकऱ्यांना 4.75 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांना 3.73 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांना 5.53 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. कोकण या संपूर्ण भागातील 541 शेतकऱ्यांना 14.01 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या मार्फत दि. 03/10/2024 रोजी प्रस्ताव साधार करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या आधारे, चंद्रपूर या जिल्ह्यातील 6172 शेतकऱ्यांना 932.02 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे.
विभागीत आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत 30/9/2024 रोजी प्रस्ताव साधार करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या आधारे, बीड या जिल्ह्यातील 69492 शेतकऱ्यांना 5462.98 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील 626 शेतकऱ्यांना 21.08 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत परभणी जिल्ह्यातील 529761 शेतकऱ्यांना 54859.89 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर या भागातील 609579 शेतकऱ्यांना 60343.95 लाख ऐवढा निधी मंजूर करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत अजून 1 प्रस्ताव 01/10/2024 रोजी साधर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या आधारे लातूर या जिल्ह्यातील 358767 एवढ्या शेतकऱ्यांना 38414.38 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यात या 7 जिल्ह्यासाठी एकून 975059 एवढ्या शेतकऱ्यांना 99704.36 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्ये जिल्हे यामंध्ये समाविष्ट नाही, त्याजिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अजून देखील पंचनामे झाले नाही, त्या जिल्याचे पंचनामे झाले की त्यांच्या साठी शासनाच्या माध्यमातून अजून एक gr निर्गमित करण्यात येईल. त्या gr च्या माध्यमातून उर्वरित जिल्ह्यामंध्ये देखील नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे.