Cotton rate ; यंदा तरी कापसाला चांगला भाव राहील का, पहा परिस्थिती..
2022 मध्ये कापसाने 12 हजारांचा टप्पा पार केला होता, 2023 मध्ये मात्र कापसाच्या मोठी घसरण पहायला मिळाली…मागील वर्षी हंगामाच्या सुरुवातीला 9000 रूपयांचा भाव मिळू लागला त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस 10 हजार पार होईल असे वाटले.मात्र कापसाचे भाव हळूहळू कमी होत गेले ते पुन्हा वाढलेच नाही…
मागच्या हंगामात शेतकऱ्यांना 7 हजार ते 7500 च्या दरम्यान भाव कापसाला मिळाला म्हणजे 2022 च्या तुलनेत जवळपास 4 ते 5 हजारांनी कापसाचे भाव उतरले…
यंदाही कापसाला 7521 रूपयांचा हमीभाव देन्यात आलाय…हमीभावात 2023 पेक्षा 400 रूपयांची वाढ यंदा करण्यात आलेली आहे.
सध्या कापूस वेचनीला सुरुवात झालीय मात्र बाजारातील आवक आजून चालू झालेली नाही….यंदा कापसाला काय भाव मिळेल,कापूस 8 हजार पार होईल, ओल्या कापसाला काय भाव मिळेल याबाबत अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहेत.. पण परीस्थिती येत्या काही दिवसांनी समोर येईल