Cotton news today ; देशात सध्या किती कापसाची आवक आणि बाजारभाव किती
Cotton news today : सध्या देशाच्या बाजारपेठेत दररोज 30 ते 35 हजार क्विंटल कापूस आयात केला जात आहे. हि आवक गेल्या हंगामापेक्षा कमी असुन बाजारपेठेत आवक कमी असल्याने कापसाच्या दरात सुधारणा असल्याचे बाजार तज्ञांचे तज्ज्ञांचे मत आहे. (Cotton price 2024)
मागील वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशात दररोज 6 हजार ते 7 हजार गाठी कापसाची आवक होती. मात्र यंदा ही आवक कमी आहे, कारण यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये कापसाची लागवड कमी झाली आहे. सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कापसाची आवक सुरू असून राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशात कापसाची वेचणी सुरू झाली आहे. त्यामुळे कापसाची आवक कमी आहे. येत्या 10 ते 15 दिवसांनी 50 हजार ते 55 हजार क्विंटल कापसाची आवक होईल. नोव्हेंबरमध्ये आवकेत आणखी वाढ होईल. (Cotton news today India)
खान्देशसह राज्याच्या अन्य भागात अजूनही कापसाची आवक कमी असल्याने कापूस गावोगावी खरेदी सुरू झालेली नाही. कापसाचे दर राज्यानुसार बदलतात. खान्देशात दर्जेदार कापसाला सध्या 8100 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. नवीन कापसाचा बाजारभाव 7500 रुपये प्रतिक्विंटल आहे. (Maharashtra cotton news 2024)
Cotton news today
सध्या शेतकऱ्यांकडे कमी साठा असल्याने देशात कापसाची आवक जास्त नाही. शेतकऱ्यांनी अद्याप कापूस साठवून ठेवण्यास सुरुवात केलेली नाही. तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले आहे. कोरडवाहू आणि नदीपात्रातील कापसाच्या उत्पादकतेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून जास्त साठा आणि भावावर अधिक दबाव या मुद्दय़ांवर यंदाच्या बाजारात फारशी चर्चा होणार नाही, असेही जाणकार सांगत आहेत. (News today cotton maharashtra)