नमो शेतकरी योजनेचा 5 व्या हप्त्याची तारीख फिक्स….

नमो शेतकरी योजनेच्या 5 व्या हप्त्याची तारीख फिक्स……कधी येनार पहा..

नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, राज्य सरकारच्या मार्फत pm किसान योजनेच्या धर्तीवर बनवण्यात आलेली आहे. या योजनेचे आतापर्यंत 4 हप्ते महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे. व आता पाचव्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत 30/सप्टेंबर/2024 शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

नमो शेतकरी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमंध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी ₹2254.96 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. नमो शेतकरी योजनेमंध्ये यापूर्वीचे पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट ते नॉव्हेंबर महिण्यामंधले जे काही 2000 रुपयांचा हप्ता आहे, त्या हप्त्यासाठी ₹2254.96 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात मान्यता देण्याय आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 5वा हप्ता आहे, तो हप्ता pm किसान योजनेच्या 18व्या हप्त्या सोबत येऊ शकतो. Pm किसान योजनेचा 18वा हप्ता 5/ऑक्टोबर/2024 रोजी वाशीम येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येऊ शकतो. या 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना pm किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळू शकते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमंध्ये हे शेतकरी अपात्र ठरतील….

नमो शेतकरी योजना ही योजना pm किसान योजनेच्या धर्तीवर बनवण्यात आली असल्यामुळे pm किसान योजनेचे सर्व नियम, नमो शेतकरी योजनेला लागू होतात. या योजनेमंध्ये सुद्धा ई-केवायसी पूर्ण असणे आणि आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक नाही अश्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आपण लवकरात-लवकर आपली ई-केवायसी आणि आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक करून घ्या. तुम्ही जर हे केल नाही तर तुम्ही सुद्धा या योजनेमंधून अपात्र ठरतात.

Leave a Comment