हरबरा खत व्यवस्थापन ; हरभरा पेरणी करताना फक्त याच खतांचा वापर करा
हरबरा खत व्यवस्थापन ; हरभरा पिकांची पेरणी करत असताना, लागवड करत असताना कोणत्या प्रकारचे खते वापरायला पाहिजे? कोणत्या क्षेत्रासाठी कीती वापरायला पाहिजे ? बागायती क्षेत्रासाठी कोणते व किती? कोरडवाहू जमिनीसाठी कोणत्या प्रकारचे खते वापरायला पाहिजे? ही संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेण्याचा पर्यंत करणार आहोत.
शेतकऱ्यानो हरभरा पिकाला खत टाकत असताना वेग-वेगळ्या क्षेत्रासाठी वेग-वेगळ्या प्रकारचे खते टाकावे लागते. बागायती क्षेत्रासाठी खताचे प्रमाण जास्त टाकावे लागते आणि कोरडवाहू जमिनीसाठी खताचे प्रमाण कमी असले तरी चालते.
हरभरा पिकाला खत टाकत असताना एक गोस्ट कधीपण लक्षात ठेवायची ज्या खतामंध्ये फॉस्फरस आणि सल्फरच जास्त प्रमाण जास्त असते त्या खतांचा वापण आपण हरभरा पिकासाठी करायचा आहे. हे आपल्या हरभरा पिकासाठी चांगल ठरत.
बागायती हरभरा पिकासाठी कोणत्या प्रकारचे खते वापरायला पाहिजे…हरबरा खत व्यवस्थापन
बागायती क्षेत्रासाठी आपण DAP चा वापर केला पाहिजे या खतामंध्ये फॉस्फरसच जास्त प्रमाण असत, आणि याच्या सोबत सल्फर 10kg घ्यायचं आहे. ज्येनेकरून आपल्या हरभऱ्याला घाट्याच प्रमाण जास्त होईल . आणि 15.15.15 हे खत सुद्धा यामंध्ये घ्यायचं आहे.
DAP : 1 बॅग + सल्फर : 10kg + 15. 15. 15 : 1 बॅग
हे जर खत उपलब्ध होत नसेल तर याएवजी अजून ऐका प्रकारचे खते तुम्ही बागायती क्षेत्रासाठी वापरू शकता.
SSP : 3 बॅग
MOP : 25kg
युरिया : 30kg
या पैकी कोणतेही खते तुम्ही बागायतो क्षेत्रासाठी वापरू शकता.
कोरडवाहू जमिनीसाठी कोणत्या प्रकारचे खत वापरू शकतो….
कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा आपण DAP चा वापर करू शकतो आणि DAP सोबत आपण सल्फर घेऊ शकतो.
DAP : 1 बॅग
सल्फर : 10 kg
या प्रमाणात वापरू शकता.
किंवा
सिंगल सुपर फास्पेट : 2 बॅग
MOP : 25 kg
अशा प्रमाणात सुद्धा कोरडवाहू क्षेत्रासाठी खत वापरल तरीसुद्धा चालेल. कोरडवाहू क्षेत्रासाठी जास्त प्रमाणात खत टाकायची काहीही गरज नाही.