Crop insurance रब्बीतही 01 रूपयात पिकविमा काढता येणार हि कागदपत्रे आवश्यक

Crop insurance रब्बीतही 01 रूपयात पिकविमा काढता येणार हि कागदपत्रे आवश्यक

Crop insurance राज्य सरकारने खरिप हंगामात राबवल्या प्रमाणे रब्बी हंगामात सुद्धा एक रुपयात पिकविमा काढता येणार आहे. एक रुपयात पिकविमा या योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्याप्रमाणे रब्बीतसुद्धा पिकविमा योजनेला मोठा प्रतिसाद मिळेल.

एक रुपयात पिकविमा या योजनेत शेतकरी हिस्सा संपूर्ण राज्य शासन भरणार असुन शेतकऱ्यांना फक्त एका पिकासाठी एक रूपये एवढा खर्च येणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून पिक संरक्षण मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिकविमा भरावा असे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी प्रत्येक अर्जासाठी फक्त एक रुपया भरावा, सेवा केंद्र चालकाला विमा कंपनीकडून प्रत्येक अर्जाचे 40 रुपये दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी फक्त एक रुपया भरावा. रब्बी हंगामातील पिकाचा पिकविमा भरण्यासाठी खालील प्रमाणे शेवटची तारीख आहे.

रब्बी हंगामातील पिकविमा भरण्याची शेवटची तारीख….

1)रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी 30/ नोव्हेंबर पर्यंत पिकविमा काढता येणार आहे.

2) गहू ,हरभरा आणि कांदा पिकासाठी 15/डिसेंबर पर्यंत पिकविमा काढता येणार आहे.

3) उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात या पिकासाठी 31/मार्च पर्यंत विमा काढता येणार आहे.

शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी फक्त 01 रुपये भरुन https://pmfby.gov.in या पोर्टलवर स्वतः शेतकरी तसेच बॅक, विमा कंपनी आणि सामुहिक सेवा केंद्रावर नोंदणी करता येईल. रब्बी हंगामात पिकविमा भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे..

रब्बी हंगामात पिकविमा भरण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक rabbi crop insurance

रब्बी हंगामातील खरिप हंगामाप्रमाणे एक रुपयात पिकविमा काढता येणार आहे. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, रब्बी कांदा या पिकाचा पिकविमा काढता येणार आहे. पिकविमा नोंदणी हि 01/नोहेंबर पासून सुरू होणार आहे. पिकविमा भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

1) सातबारा उताराउतारा आणि होल्डिंग.

2) बॅक पासबुक झेरॉक्स.

3) आधार कार्ड झेरॉक्स..

4) पिकपेरा स्वयंघोषणा पत्र

इत्यादी कागदपत्रे पिकविमा नोंदणी साठी आवश्यक आहे.

 

 

Leave a Comment