Dana cyclone डाना चक्रीवादळ आज किनाऱ्यावर धडकणार…
Dana cyclone ; बंगालच्या उपसागरात तयार झालेले डाना चक्रीवादळ आता तीव्र झाले असून हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगाल च्या दिशेने पुढे सरकत आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसणार असुन आज हे चक्रीवादळ पुरी आणि सागर बेटाच्या दरम्यान किनाऱ्यावर धडकणार आहे. चक्रीवादळ जमीनीवर येताच 100 ते 120 किमी वेगाने वारे वाहणार असुन मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात 22/ऑक्टोंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते आणि 23/ऑक्टोंबर रोजी याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्याकडे सरकत असून हे चक्रीवादळ ओडिशाच्या परादिप पासून 210 किमी तर धामरापासून 240 किमी तसेच बंगालच्या सागर बेटापासून 310 किमी अंतरावर आहे. Dana cyclone
हे वाचा – पंजाबराव डख हवामान अंदाज पावसात उघाड पण पुन्हा पावसाचा अंदाज
डाना चक्रीवादळ आज 25/ऑक्टोंबर ओडिशाच्या पुरी आणि सागर बेटावर धामरा आणि भितरकनिका जवळ जमीनीवर येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर ताशी 100 ते 120 किमी वेगाने वारे वाहणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्रात दोन मिटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे.
हे वाचा – कापूस सोयाबीन अनुदान मिळाले का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर
Dana cyclone चक्रीवादळ जमीनीवर आल्यावर हळूहळू ओसरेल तसेच मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.