रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवर असे करा डाउनलोड…सविस्तर पहा

रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवर असे करा डाउनलोड…सविस्तर पहा

मित्रांनो आपले रेशन कार्ड जर फाटले असेल किंवा राशन कार्ड हरवले असेल तर काळजी करायची गरज नाही कारण की, आपण घरबसल्याच आपले राशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकतो.

रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करायची जी अप्लिकेशन आहे ती केंद्र सरकारच्या मार्फत बनवण्यात आलेली आहे. तर त्या ॲप्लिकेशनच्या मार्फत तुम्ही 5 मिनिटाच्या आत तुम्ही राशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकता. रेशन कार्ड डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही ते राशन कार्ड कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. ऑनलाइन पद्धतीने काढलेले राशन कार्ड वापरताना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही.

ऑनलाइन पद्धतीने राशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा…

रेशन कार्ड आँनलाईन काढन्यासाठी

1) सर्वप्रथम रेशन कार्डची mera ration 2.0 ही एप्लीकेशन डाउनलोड करा.

2) एप्लीकेशन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनला परमिशन द्यायची आहे.

3) परमिशन दिल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा लिवडायची आहे. भाषा निवडल्यावर next वर क्लिक करायचं आहे.

4) पुढील पेजवर गेल्यावर get started वर क्लिक करायच आहे.

5) get started वर क्लिक केल्याच्या नंतर beneficiaries users निवडून आपल्या मोबाईल नंबरला लिंक असलेला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्या नंतर खालील असलेला captcha टाकून login with OTP वर क्लिक करायचं आहे. ( login with OTP वर क्लिक केल्याच्या नंतर काही वेळा प्रॉब्लेम येऊ शकतो.)

6) login with OTP वर क्लिक केल्याच्या नंतर OTP sent successfully लिहून आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे ok करून, OTP टाकून verify वर क्लिक करायचं आहे. Verify क्लिक केल्याच्या नंतर OTP verify successfully हे लिहून आल्यावर ok वर क्लिक करायचं आहे.

7) त्यानंतर create MPIN हे तुम्हाला तिथे दिसेल तेथे तुम्हाला skip वर क्लिक करायचं आहे.

हे झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचे राशन कार्ड दिसेल. त्यानंतर तुम्हाला तिथे राशन कार्डच्या एक्या कोपऱ्यात डाउनलोडचे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे राशन कार्ड डाउनलोड होईल.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्याच तुमच्या मोबाईल मध्ये राशन कार्ड डाउनलोड करू शकता.

Leave a Comment