बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस – मंत्रीमंडळ निर्णय…

बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस – मंत्रीमंडळ निर्णय…

बांधकाम कामगार ; येत्या दिवाळीला राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5000 रूपयांचा बोनस मिळणार आहे. याबाबत मंत्रीमंडळाचा निर्णय झालेला असून याबाबत बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी दिली आहे. हे बोनस राज्यातील 54 लाख 38 हजार 585 कामगारांना मिळणार आहे.

बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस मिळावा यासाठी 08/ऑक्टोंबर/2024 रोजी कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यावर कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करत बोनस देण्याबाबत आश्वासन दिले होते.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत बांधकाम कामगारांना 5000 रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकुण 5438585 बांधकाम कामगारांना 5000 रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

बांधकाम कामगार योजना दिवाळी बोनस च्या अटी आणि शर्ती

🔵 बांधकाम कामगार योजना मध्ये व्यक्ती नोंदणीकृत असावा.

🔴 त्याची प्रोफाइल Active असावी.
बांधकाम कामगार कार्डचे Renewal केलेले असावे.

🟠 बँक खाते बांधकाम कामगार योजनेला लिंक असावे.

Leave a Comment