लाडकी बहीण योजना ; लाडक्या बहीणींना पुन्हा मोठी खुशखबर, लगेच पहा..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे. आतापर्यंत लाडकी बहीन योजनेचे 5 हप्ते महीलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. परंतु आता ऑनलाईन पद्धतीने किंवा अॅपने अर्ज करता येणार नाही. आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे…
आजपर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात तब्बल 5 हफ्ते म्हणजे 7500 रुपये जमा झाले आहेत. लाडकी बहीन योजनेला मिळत आसलेल्या प्रतीसादामुळे अर्ज करन्यासाठी 15 आँक्टोंबरपर्यंत मुदतवाढ देन्यात आली आहे…