हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाचा अंदाज ; या भागात पावसाचा अंदाज…
हवामान अंदाज ; राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होत आहे. सकाळच्या वेळी हवेत गारवा कायम असून, धुके पडल्याचे चित्र कायम येत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज दि. 29/ऑक्टोंबर रोजी पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आकाश स्वच्छ झाल्याने कडक सूर्यप्रकाश असुन उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे. यातच पहाटेच्या वेळी हवेत गारठा असल्याचे चित्र कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता – हवामान विभाग
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव.