हरभरा सुधारित वान ; हे वान देतात जबरदस्त उत्पादन…
शेतकरी मित्रांनो,,,आजच्या व्हिडीओत आपण, हरबरा पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन देनार्या काही वानांबद्दल जानून घेउयात…ज्या वानांची पेरणी करून आपल्याला हरबरा पिकाचे भरघोस उत्पादन मिळेल.
यामध्ये पहिल्या नंबरवर पसंती दिला जानारा वान म्हनजे जाकी – 9218 ….विषेषतः महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आलेला हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. पिवळसर आणि आकर्षक गोलाकार आकाराचे दाने आसलेला वान आसून या वानाचे चांगले उत्पादन शेतकरी घेतात…
त्यानंतर दुसरा वान म्हनजे विराट …या वाणांचा कालावधी 110 ते 115 दिवसाचा असुन टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारकक्षम आहे..विशेषतः महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आलेला हा वान आसून 100 दाण्यांचे वजन 35 ग्रॅम एवढे आहे. या वानाची पेरणी करून तुम्हाला चांगले उत्पादन नक्कीच मिळेल….
त्यानंतर पुढचा वान म्हनजे व्दिग्विजय…. या वाणाचा कालावधी जिरायती साठी 90 ते 95 दिवसाचा असुन बागायती साठी 110-115 दिवसाचा आहे पिवळसर तांबूस दाणे, मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी हा वान योग्य आहे.याचेही तुम्हाला चांगले उत्पादन नक्कीच मिळेल
यानंतरचा वान आहे विशाल….या वाणाचा कालावधी बागायती साठी 105 ते 115 दिवसाचा असुन आकर्षक पिवळसर टपोरे दाणे आसलेला हा वान आहे.मर रोगास प्रतिकारक्षम आसून याचेही चांगले उत्पादन तुम्हाला नक्कीच मिळेल…
यानंतरचा तुमच्या परीचयाचा आसलेला वान म्हनजे विजय ; या वाणांचा कालावधी जिरायती 90 दिवस तर बागायती 110 दिवसाचा आहे. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असुन मर रोगास प्रतिकारक्षम आसलेला हा वान आहे… जिरायती बागायत आणि उशिरा पेरणीस योग्य आहे.