हरबरा मर रोग उपाययोजना ; असे नियोजन करा मर येनारंच नाही

हरबरा मर रोग उपाययोजना ; असे नियोजन करा मर येनारंच नाही

शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढून झालेल्या आहेत आणि आता सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामात हरभरा किंवा गहू पेरायच्या आहे. तर आपण हरभरा पेरणी अगोदर हरभऱ्यावर होणारे जे मर रोग आहे त्यावर कंट्रोल कसे करायचे हे पाहणार आहे. ( हरभरा पेरणीच्या अगोदर )

हरबरा मर रोग उपाययोजना ; मित्रांनो आपण हरभरा मर रोगावर, हरभरा पेरणीच्या अगोदरच नियंत्रण असे करायचे हे बगणार आहे. आपण हरभरा मर रोगावर आपण 2 उपाय सांगणार आहोत हे 2 उपाय जर हरभरा पेरणी अगोदर जर केले तर आपला हरभऱ्याचा पाने 100% सुकणार नाही.

बरेच शेतकरी हरभरा उगवून आल्याच्या नंतर त्याच्यावरून मर रोगाच्या फवारण्या घेतात. त्या फवारण्याने आपल्या हरभऱ्याला काहीसा फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या हरभऱ्याचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात घटते. आणि आपल्याला काहीवेळा हरभरा पिकामंध्ये, तोट्यात जावे लागते.

 

हरभरा पिकांची मर होण्याचे कारण…

हरभरा पिकाच्या पेरणी अगोदर जमिनीमंध्ये असलेल्या `फिजोरियम विल्ट´ नावाच्या बुरशी ह्या हरभऱ्याच्या पिकाचा नास करतात. ह्या बुरशी हरभरा पिकाच्या मूळ्यांवर अट्याक करून त्या मुळ्यांना खाऊन घेते. त्यामुळे हरभरा पिकाला जमीनेतून लागणारे जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य हरभरा पिकाला मिळत नाही. त्यामुळे हरभरा पिकाचे झाड वाळून जाते.

अनेक शेतकरी हरभरा पीकाची पेरणी झाल्याच्यानंतर त्यावर हरभरा पिकांची मर न होण्याचे वेगवेगळे उपाय करतात जसे की फवारणी किंवा खाते टाकतात. तरी देखील त्यांच्या हरभरा पिकांची मर होण्याची थांबत नाही. कारण फवारणी केल्याच्यानंतर हरभरा पिकांच्या मूळ्यापर्यंत त्या फवारणीचे टॉनिक जात नाही, आणि आपल्या हरभरा पिकांची मर होण्याचे मुख्य कारण तर जमिनीत असलेल्या बुरशी आहे.

 

हरबरा मर रोग उपाययोजना

सर्व शेतकरी सोयाबीन काढणी झाल्याच्या नंतरच हरभरा पिकांची पेरणी करतात. हरभरा पिकांची पेरणी करण्याच्या अगोदर बरेच शेतकरी त्यामध्ये रोटर किंवा पाळी घालतात. किंवा काही शेतकरी आपल्या पद्धतीने अंतरमशागत करतात. तर आपल्या शेतामंध्ये अंतरमशागत कराच्या अगोदरच आपल्या शेतात `ट्रायकोडर्मा´ चा वापर करायचा आहे. आपण आपल्या एका एकरच्या क्षेत्रामध्ये 4 किलो ट्रायकोडर्मा चा वापर करायचा. पण ट्रायकोडर्मा वापर करत असताना 10 किंवा 15 किलो त्यामंध्ये शेणखत वापरायचं आहे. शेणखत वापरण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे 4 किलो ट्रायकोडर्मा ऐका ऐकरासाठी पूरेसा नाही. त्यामुळे आपण त्यात शेणखताचा वापर करणार आहोत.

ट्रायकोडर्मा वापर केल्याच्या नंतरच आपण आपल्या शेतामनध्ये आंतरमशागत करायची आहे. जेणे करून जमिनीमंध्ये असलेल्या बुरशी ट्रायकोडर्मा पूर्णपणे खाऊन घेतो, आणि पूर्णपणे बुरशी नाहीश्या होत्या. हरभरा पिकाच्या मर रोगासाठी ट्रायकोडर्माचा वापर हा सर्वात सोपा आहे.

त्यानंतर आपण हरभरा पेरणी करताना बीजप्रक्रिया सुद्धा करायची आहे. बीजप्रक्रिया करत असताना “बायर कंपनीचे एवरगोल एक्सटेंड” हे बुरशीनाशक वापरायच आहे. हे बुरशीनाशक आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी 2ml वापरायच आहे.

आपण हरभरा पेरणी करण्याअगोदर हे 2 उपाय जर केले तर आपल्या हरभरा पिकाची मर होणार नाही. सर्वप्रथम अंतरमशागत करण्याअगोदर ट्रायकोडर्मा वापर करायचा आहे. ट्रायकोडर्माचा वापर करत असताना ट्रायकोडर्मा हे जमिनीच्या आतमध्ये गेला पाहिजे. आणि त्यानंतर बीज प्रक्रिया करायची आहे.

Leave a Comment