हमीभाव खरेदी नंतर सोयाबीनला किती बाजारभाव मिळेल – व्यापाऱ्यांचे अंदाज
सोयाबीन भाव ; सध्या बाजारात सोयाबीनला 3800 ते 4300 बाजारभाव मिळत आहे. सध्या बाजारभाव कमी असल्यामुळे सोयाबीनची आवक सुद्धा खुप कमी असल्याचे व्यापारी सांगतात. सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू केली आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू झाल्यावर सोयाबीनला बाजारात किती बाजारभाव मिळेल याबाबत मार्केट मधील व्यापाऱ्यांचे काय अंदाज आहेत पाहुया.
सोयाबीनचे बाजारभाव पडल्याने सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी आदेश काढले आहेत. सोयाबीनची हमीभावाने (4892) रुपयांनी खरेदी करण्यात येणार आहे. सध्या सोयाबीन मध्ये ओलावा जास्त असल्याने खरेदी मध्ये अडचणी येत आहेत परंतु लवकरच खरेदी केंद्रात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आज डाना चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार या भागात मुसळधार पाऊस
नाफेडच्या माध्यमातून सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू झाल्यावर सोयाबीन बाजाराला आधार मिळेल असे सोयाबीन बाजारातील व्यापारी सांगतात. सध्या कमीत कमी 3800 तर जास्तीत जास्त 4300 एवढा सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे. हमीभावाने खरेदी सुरू झाल्यावर सोयाबीनला 4800 ते 4900 रूपये बाजारभाव मिळेल असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
परतीच्या पावसाने अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे तसेच काढणी केलेल्या सोयाबीनची मळणी करण्यासाठी मळणी यंत्र शेतात जात नसल्याने सोयाबीनची मळणी खोळंबली आहे. तसेच बाजारात अतिशय कमी दर मिळत असल्याने सध्या बाजारात खूप कमी सोयाबीनची आवक असल्याचे व्यापारी सांगतात.
हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू झाल्यावर बाजाराला आधार मिळेल व सोयाबीनला 4700 ते 4800 रूपये बाजारभाव मिळेल असे सोयाबीन बाजारातील व्यापारी सांगतात.