सोयाबीन भाव ; सोयाबीन विक्रीची घाई करू नका, हे काम करा
मित्रांनो यंदा सोयाबीनला 4892 रूपयांचा हमीभाव देन्यात आलाय मात्र सोयाबीनला सध्या 4000 ते 4400 रूपयांपर्यंत भाव मिळतोय…त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये आणि हमीभावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकु नये असं बाजारभाव तज्ज्ञ सांगतात…
सध्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू झालीय, आणि हमीभाव केंद्रात नाव नोंदणीही सुरु झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करुन हमीभावाने सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरनार आहे..
हमीभावाने सोयाबीन विक्री करताना 12% ओलाव्याची अट घालन्यात आलेली आहे त्यामुळे सोयाबीनला उन देऊन ओलावा कमी झाल्यावरच हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जानार आहे.
नोंदणी करन्यासाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक सोबत घेउन जावे. नोंदणी केल्यानंतर मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा…सोयाबीन खरेदीसाठी 12% ओलाव्याची अट आसल्यामुळे सोयाबीनला उन देउनच विक्रीसाठी न्यावे तरच खरेदी करन्यात येनार आहे.