बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार का; अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

बांधकाम कामगारांना 5000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार का; अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

बांधकाम कामगार ; राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीला ५ हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत अधिक माहिती पाहता ही अफवा असल्याचे समोर आले आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीत ५ हजार रुपये बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू असताना शासकीय योजनेचा लाभ तात्पुरता थांबला आहे.

 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले, या निर्णयांमध्ये अनेक योजनांना मंजुरी देण्यात आली, मात्र दिवाळीत बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांच्या तरतुदीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, बांधकाम कामगारांनी सतर्क राहावे, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे.

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात बांधकाम कामगारांना दिवाळीत बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून, बांधकाम कामगारांनी संबंधित कार्यालयात चकरा मारू नये, या अफवेवरून बांधकाम कामगारांची लूट होण्याची शक्यता आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीत बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही.

 

Leave a Comment