पीक विमा मंजूर, खरीप 2023 ची भरपाई सरकार देणार…..

पीक विमा मंजूर, खरीप 2023 ची भरपाई सरकार देणार…..

मित्रानो 2023 मंध्ये झालेल्या नुकसानी करीता राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. 2023 मंध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना परंतु आध्याप्त देखील पीक विम्याच वाटप न झालेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. अखेर 2023मंध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 30/सप्टेंबर/2024 रोजी GR निर्गमित करून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याला पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात 2023 मंध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती. अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आला होता परंतु पिक विमा कंपन्यांच्या मार्फत पिक विमा वाटप करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होता. पूर्ण राज्यांमध्ये पिक विमा “बीड पॅटर्न” म्हणजेच “कप अँड कॅप पॅटर्नच्या” मार्फत राबवली जात आहे. ज्यांच्या मध्ये पीक विमा 110% च्या जास्त प्रमाणात जर राबवला जात असेल तर 110% च्या वरची रक्कम असेल तर राज्य सरकारला जमा करावी लागत आहे. आणि 110% च्या जर कमी रक्कम असेल तर ती रुक्कम पिक विमा कंपनीच्या मार्फत वितरित करण्यात येते.

परंतु अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्यांमंध्ये 3307 कोटी रुपयांचा निधी करण्यात मंजूर देण्यात आली होता. 110% टक्याच्या प्रमाणे पीक विमा कंपन्याच्या मार्फत 1380 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार होता आणि राज्य सरकारच्या मार्फत 110% पेक्षा जास्तीचा पीक विम्याचे 1926 कोटी रुपये देण्यात आल्याच्या नंतरच ह्या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार होते.

राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वीचे 1254 कोटी रुपयांचा निधी वितरिक करण्यात आला होता. आणि याच्या वितरिक्त आताचे मंजूर झालेले 1926 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्हातील शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

Leave a Comment