ईशान्य मान्सून महाराष्ट्रातुन बाहेर हवामान तज्ञ रामचंद्र साबळे (हवामान अंदाज)
ईशान्य मान्सून ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी आज नवीन अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रावर दि. 27/28/ ऑक्टोबर रोजी 1010 एवढा हवेचा दाब राहिल तसेच 29/30 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा हवेचे दाब 1008 एवढे कमी होतील यादरम्यान बंगालच्या उपसागरात 1004 एवढा हवेचा दाब असेल. या सर्व हवामान प्रणाली च्या प्रभावाने ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमी होईल आणि ईशान्य मान्सून राज्यातुन बाहेर पडेल.
ईशान्य मान्सूनचा प्रभाव आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये काही काळ सक्रिय राहिल. ईशान्य मान्सून राज्यातुन बाहेर पडल्यानंतर वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वारे वायेव्येकडुन वाहतील. परीणामी राज्यात थंडीत वाढ होईल तसेच दिवसाच्या तापमान घसरणीला सुरूवात होईल.
दि. 27/ 28/ ऑक्टोबर ला राज्यात कुठे ही पावसाची शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील खरीप पिकांच्या काढणीला व कापूस वेचणीस हवामान अत्यंत
अनुकूल राहील. पावसात उघडीप असल्याने रब्बी च्या पेरणीसाठी हवामान अनुकूल राहील. (रामचंद्र साबळे)
प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ 16 अंश सेल्सिअस व इक्वॅडोरजवळ 21 अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला निना’चा प्रभाव राहणार नाही. मात्र बंगालचे उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्प निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरूच राहील. त्यातून ढगनिर्मिती होईल. हिंदी महासागराची ही स्थिती तशीच राहील.(जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे)