पंजाबराव डख हवामान अंदाज या तारखेला पुन्हा पावसाचा अंदाज
पंजाबराव डख ; महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 23/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलाय. मागील अंदाजा मध्ये सांगितल्याप्रमाणे 19/ऑक्टोंबर ते 23/ऑक्टोंबर दरम्यान राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. पाहूया पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज…
दि. 24/ऑक्टोंबर रोजी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील पाऊस निघून गेला असुन आता जोरदार पावसाची शक्यता नाही. राज्यात आज मोठ्या प्रमाणावर धुई धुके पडले होते आणि हरभरा पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे डख यांनी सांगितले आहे. हरभरा पेरणी करताना बीजप्रक्रिया करून नंतर पेरणी करावी असेही डख यांनी सांगितले आहे.
दि. 24/ऑक्टोबरला राज्यात धुई आणि धुके आले आहे. यानंतर, मग थंडीला सुरुवात होणार आहे. 25 /ऑक्टोबर पासून राज्यातील काही भागांमध्ये थंडीला सुरुवात होईल आणि 05/नोव्हेंबर पासून राज्यात सर्व दूर थंडी पडेल. (पंजाबराव डख हवामान अंदाज)
राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज – पंजाबराव डख
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले की राज्यातील पाऊस निघून गेला असला तरी दिवाळीला (01/नोव्हेंबर) पुन्हा एकदा तुरळक ठिकाणी पावसाचा शक्यता आहे तरी सतर्क रहावे. दिवाळीला राज्यात सार्वत्रिक व मोठ्या पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.